शेतकरी (Farmer) आपल्या पिकाची खूप योग्यपद्धतीने काळजी घेत असतात पण निसर्गापुढे आणि वन्यप्राण्यांपुढे हतबल होतात. वन्य प्राण्यांमध्ये जंगली डुक्कर शेतकऱ्यांच्या पिकांची खूप नासाडी करतात. पण आता याबाबत एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने जंगली डुकरांपासून पीक वाचविण्यासाठी चक्क भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
शिंदे गट गुवाहाटीला कोणाचा बळी द्यायला चालले काय माहित? – अजित पवार
रानडुक्कर हरभरा पिकाची खूप नासाडी करत असल्याचे लक्षात आल्यावर शेतकरी पुत्राने रानडुकरापासून हरभरा बियाण्याचा बचाव करण्याची नवीन शक्कल लढवली आहे. या शेतकऱ्याने हरभऱ्याची पेरणी करण्याआधी त्या बियाण्यावर अंघोळीला वापरण्यात येणारे शाम्पू लावून ते उन्हात वाळविले.
शिंदे गट गुवाहाटीला कोणाचा बळी द्यायला चालले काय माहित? – अजित पवार
नंतर शेतकरी पुत्रांनी त्या बियाण्यावर कीड प्रतिबंधक औषधी व रसायने लावले आणि शेतात पेरणी केली. रानडुकरांनी शेतात बियाणे खाल्ले असता शाम्पूमुळे त्यांच्या तोंडामध्ये फेस होतो. यामुळे रानडुकर शेत सोडून पळू लागले. शेतकऱ्याच्या या कल्पनेची जोरदार चर्चा होत आहे.
“अमृता फडणवीस 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत”, रामदेव बाबांचे विधान चर्चेत