Site icon e लोकहित | Marathi News

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत, पालकमंत्री लोढा यांनी घेतली पीडितांची भेट

1 million aid to the family of the girl who died in the leopard attack, Guardian Minister Lodha met the victims

मुंबईतील आरे कॉलनीमध्ये (Aarey Colony) बिबट्याने (a leopard) केलेल्या हल्ल्यात एका मुलीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Guardian Minister Mangalprabhat Lodha) यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी याबाबत तात्काळ सूचना देत मदत पोहचवण्याचे आदेश दिले. येत्या १० दिवसात संबंधित कुटुंबीयांना मदत पोचवण्याचे आदेश लोढा यांनी दिले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील नक्की आहे तरी कोण? वाचा सविस्तर

याबाबत मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, पुढच्या आठ दहा दिवसांमध्ये वनखात्याकडून पीडित कुटुंबीयांच्या खात्यामध्ये १० लाख रुपयांचा धनादेश जमा होणार आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे आर्थिक मदत हा मदतीचा एक भाग आहे, त्यामुळे मृत्यूचे दु:ख आणि त्यामुळे झालेली हानी भरून येणारी नाही. त्यामुळे भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

Kili Paul: किली पॉल गातोय ‘तुझ मे रब दिखता है…’; नक्की कोणाच्या प्रेमात पडला?

दीपावलीच्या पहिल्याच दिवशी आरेतील युनिट क्रमांक 15 येथे इकिता लोट (Ikita lot )हिच्यावर बिबटय़ाने हल्ला केला होता. त्यात तिचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आमदार रवींद्र वायकर यांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी करत इकिताच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच आर्थिक मदतही केली. इकिताच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार मदत करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या होत्या. राज्य शासनाच्या नियमानुसार इकिताच्या कुटुंबीयांना एकूण 20 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

Google: गूगल सर्च करणं महिलेला पडलं महागात, तुम्हीही गुगलवर ‘ही’ गोष्ट सर्च करताय? तर सावधान

त्यानुसार राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात दहा लाखांचा रुपयांचा धनादेश इकिताच्या कुटुंबीयांना शनिवारी देण्यात आला. यावेळी वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी राकेश भोईर, वनपाल अधिकारी नारायण माने, रामा भांगरे, धुरी, वनरक्षक सुरेंद्र पाटील, उपविभागप्रमुख जितेंद्र वळवी, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, शाखाप्रमुख बाळा तावडे, संदीप गाढवे, मयूरी रेवाळे, हर्षदा गावडे, राहुल देशपांडे, पूजा शिंदे, अजय प्रधान, वैभव कांबळे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Spread the love
Exit mobile version