Fire Accident । हृदयद्रावक! लग्न समारंभात लागलेल्या आगीमध्ये १०० जणांचा मृत्यू तर १५० जण जखमी

100 people died and 150 were injured in the fire that broke out at the wedding ceremony

Fire Accident । लग्न सराईचा (Wedding) हंगाम सुरु आहे. मोठ्या जल्लोषात सेलिब्रेटींसह सर्वसामान्य लोक लग्नसोहळा पार पाडत आहेत. प्रत्येकजण या क्षणाचा आतुरतेने वाट पाहत असतात. लग्नमंडपातले अनेक किस्से सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल होत असतात. नेटकरीही त्याला चांगला प्रतिसाद देतात. परंतु आता लग्न समारंभातच आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Latest Marathi News)

Shivsena MLA Disqualification Case । बिग ब्रेकिंग! ‘या’ दिवशी होणार आमदार अपात्रता प्रकरणाची अंतिम सुनावणी

या आगीत तब्बल १०० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर तर नववधू, वरासह १५० जण जखमी झाले आहेत. ही घटना इराकच्या निनवेह प्रांतातील हमदानिया भागातील आहे. परंतु, आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अजूनही कोणतीच माहिती समोर आली नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.

Crime News । नकार जिव्हारी लागला! रागाच्या भरात गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्टवर…

ही आग घटनास्थळी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, CCTV फुटेजमध्ये लग्नाच्या हॉलमध्ये जळत असलेला मलबा दिसत आहे. या घटनेतील जखमींना प्रादेशिक रुग्णालयात पाठवले आहे, याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

Eknath Shinde । ठरलं तर मग! लोकसभेची ‘ती’ जागा शिंदे गटालाच मिळणार

Spread the love