सध्या ट्विटर, मेटा ,अमेझॉसह अनेक कंपन्यांनी नोकरी कपात सुरु केली आहे. यामुळे नोकरदारांवर नोकरी सुटण्याची टांगती तलवार उभी राहिली आहे. अशातच भारतातील एका सुप्रसिद्ध कंपनीने नोकरदारांची भरती करून घेणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना दिलासा मिळाला आहे.
शिंदे-फडणवीस सरकार अखेर शेतकऱ्यांना पावले; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय
प्रसिद्ध सॅमसंग कंपनी भारतातील संशोधन व विकास ( Research And Development) विभागासाठी इंजिनिअर्स ची भरती करणार आहे. यामध्ये सुमारे 1000 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. बेंगळुरू, नोएडा, दिल्ली आणि सॅमसंग सेमीकंडक्टर इंडिया रिसर्चमधील R&D संस्थांचा यामध्ये समावेश असणार आहे.
आता महिला चालवणार राज्याचा कारभार? उद्धव ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
एआय, एमएल, डीप लर्निंग, इमेज प्रोसेसिंग, आयओटी, कनेक्टिव्हिटी, क्लाउड, बिग डेटा, बिझनेस इंटेलिजन्स, प्रेडिक्टिव अॅनालिसिस, कम्युनिकेशन नेटवर्क्स, सिस्टम यांसारख्या नवीन-युग तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी या इंजिनिअर्सची भरती होणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये हे भरती झालेले इंजिनिअर्स कंपनीमध्ये कामासाठी सहभागी होतील. अशी माहिती कंपनीने दिली आहे.
मोठी बातमी! ऊसाला मिळणार डिजिटल वजनकाटे
अगामी काळात नावीन्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष बळकट करणे. यासोबतच देशातील उच्च इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट मधील तरुण व प्रतिभावान इंजिनिअर्सना भरती करून घेणे हे सॅमसंगच्या संशोधन व विकास केंद्रांचे उद्दिष्ट आहे.
शिंदे-फडणवीस सरकार अखेर शेतकऱ्यांना पावले; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय