मुंबई येथे काल (ता.१६) महाराष्ट्र भूषण पुरस्कार पार पडला. जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला असून यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह ( Amit Shah) उपस्थित होते. थाटात पार पडलेल्या या सोहळ्याला एका गोष्टीमुळे गालबोट लागले आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अनेक लोकांना उष्माघाताचा त्रास झाला. ( Heat Stroak) यामुळे ११ जणांचा मृत्यु झाला असून 19 जणांवर उपचार सुरू आहेत.
सावधान! गूगल क्रोम वापरताय तर एकदा हे वाचाच…
खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेल्या लोकांना उष्माघाताचा त्रास झाला. यातील जवळपास १२५ लोकांनी डिहायड्रेशनची तक्रार केली. सुरुवातीला घटनास्थळी असलेल्या मेडिकल बूथ मध्ये या लोकांना उपचारासाठी न्हेले. यामधील ज्या लोकांना विशेष उपचाराची गरज होती, त्यांना कामोठे येथील एमजी एम रुग्णालयात न्हेण्यात आले. या सर्व घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यु
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनावर देखील टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मी रुग्णालययामध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. चारपाच जणांशी बोललो. यामध्ये दोनजण गंभीर आहेत. कार्यक्रमाची चुकीची वेळ कोणी दिली आणि कशी दिली? ढिसाळ नियोजनामुळे चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागली असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
एक किलो बटाट्याची किंमत अर्धा तोळा सोन्यापेक्षा आहे जास्त! किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क