जिंदाल कंपनीच्या आगीत ११ जण जखमी, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

11 people injured in Jindal company fire, Chief Minister informed

नव्या वर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी नाशिक येथे एका कंपनीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत कंपनीचे नुकसान तर झालेच आहे. परंतु, कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी व कामगार देखील जखमी झाले आहेत. ही आग लागली कशी ? याचे कारण मात्र अद्यापही समोर आलेले नाही. आता या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उर्फी जावेदला चित्रा वाघ यांनी सुनावले; चक्क अटक करण्याची केली मागणी!

नाशिकमधील घटनासथळी अग्निशमन यंत्रणा दाखल झाली असून, आतमध्ये अडकलेल्या लोकाचं बचावकार्य सुरु आहे. या घटनेमध्ये ११ लोक जखमी झाले आहेत, तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. अशी एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे. ते औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मोठी बातमी! नाशिकमधील जिंदाल कंपनीला भीषण आग

दरम्यान, इगतपुरी येथील जिंदाल ( Jindal) नामक कंपनीला आज ( दि.1) दुपारी भीषण आग लागली आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. या कंपनीत केमिकल्स देखील असल्याने केमिकल्स चे स्फोट होत आहेत. यामुळे आग आटोक्यात आणणे अवघड झाले आहे.

ऋषभ पंतच्या भेटीनंतर अनुपम खेर यांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *