राज्यभरात सध्या महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षा ( HSC exam) सुरू आहेत. दरम्यान कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण मंडळाने उचललेली ठोस पाऊले व पेपरमध्ये झालेले घोळ यामुळे ही परीक्षा चांगलीच चर्चेत आहे. दरम्यान राज्यातील काही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार घातला आहे.
यामुळे यंदाचा बारावीचा निकाल ( HSC Result 2023) लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरंतर परीक्षेच्या आधीपासूनच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे आंदोलन सुरू होते. 2005 च्या पूर्वी व त्यानंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच आश्वासित प्रगती योजना लागू करावी आणि शिक्षकांची रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरण्यात यावी या मागण्यांसाठी शिक्षकांनी आंदोलन सुरू केले होते.
संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “…तर ते चुकीचे आहे”
मात्र या मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाहीत व यावर काहीच तोडगा निघाला नाहीय, यामुळे शिक्षकांनी थेट उत्तर पत्रिका तपासणीवरच बहिष्कार टाकला आहे. मात्र या सगळ्याचा परिणाम आता मुलांना भोगावा लागणार असून कदाचित यंदाच्या बारावीच्या निकालाला विलंब होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
गौतमी पाटीलनं मराठी नंतर गाजवलं पंजाबी मार्केट, ‘तेरा पता’ नवीन पंजाबी गाणं रिलीज; पाहा VIDEO