जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Pune-Mumbai highway) एक खासगी बस दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या घटनेत २० ते २५ जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दुःख व्यक्त केलं आहे.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर शरद पवारांनी घेतला सर्वात मोठा निर्णय!
त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि देखील या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे.
बिग ब्रेकिंग! भाजप आमदाराच्या गाडीचा मोठा अपघात
दरम्यान, बोरघाटातील शिंगरोबा मंदिर जवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. ही खासगी बस पुण्याहून मुंबईला निघाली होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर ही बस दरीत कोसळली. हा अपघात पहाटेच्या वेळी झाला त्यामुळे अनेक प्रवाशी गाढ झोपेमध्ये होते. या बसमध्ये जवळपास ४० ते ४५ लोक आहे. अजून देखील बचावकार्य सुरु आहे.
अभिनेत्री स्वरा भास्कर एका चित्रपटासाठी घेते ‘इतके’ पैसे; वाचून तुम्हालाही बसेल धक्का