
मुंबई : भारतात सध्या महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. पेट्रोल, डिझेल, भाजीपाला, इंधन याच्या महागाईने नागरिक त्रस्त आहेत. आता यामध्ये अजून एक भर पडली आहे. आता ऐन सणासुदीच्या दिवसात वीज दरवाढीचा पुन्हा शॉक नागरिकांना बसणार आहे.
पॉवर सिस्टिम ऑपरेशन कोऑपरेशन लिमिटेडचे बिल महाराष्ट्र सोबत अन्य 13 राज्यांनी थकवले आहे. ही थकबाकी भरण्यासाठी विज दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येणार आहे. उन्हाळा आणि गणपती दसरा दिवाळी या मोठ्या सणासुदींच्या काळात विजेची मागणी वाढत असल्याने आता राज्यांना वीज टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
थकबाकी भरल्याशिवाय पॉवर एक्सचेंज करण्यास नकार देण्यात आलाय त्यामुळे आता 13 राज्यातील वीज कंपन्यांना पॉवर एक्सचेंज करता येणार नाही. थकबाकीचे ओझे नागरिकांवर टाकले जाणार असून वीज बिल महागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रासह महाराष्ट्रासह तामिळनाडू, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, राजस्थान, मणिपूर, कर्नाटक, मिझोराम आणि जम्मू-काश्मीर या राज्यांना देखील फक्त बसणार आहे.