इन्स्टाग्रामवर रिल्स बनवून पैसा व प्रसिद्धी मिळणाऱ्या लोकांची कमी नाही. या प्लॅटफॉर्मवर ऍक्टिव्ह राहून बरेच युझर्स चांगली कमाई करतात. रिवा अरोरा ही यातीलच एक आहे. रिवा अरोराने ( Riwa Arora) नुकतेच इन्स्टाग्राम वर 10 मिलियन फॉलोवर्स पूर्ण केले आहेत. याचे मोठे जंगी सेलिब्रेशन देखील तिने केले आहे. रिवाच्या या यशाचे कौतुक म्हणून तिच्या आईने चक्क 44 लाख किंमतीची कार रिवाला गिफ्ट केली आहे.
फाटक्या नोटांना कंटाळलात! ‘या’ ठिकणी बदलून मिळतात नवीन नोटा
ऑडी क्यू 3 ( Audi Q3) असे या कारचे नाव असून रिवाने या कारचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये तिने आपल्या आईचे व मुंबईच्या ऑडी डीलरशीपचे आभार मानले आहे. सध्या रिवा फक्त 13 वर्षाची आहे. एवढ्या लहान वयात ती 44 लाखांच्या कारची मालकीण झाली आहे. या कारमुळे रिवा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
शेतकऱ्यांची चिंता काही थांबाना! 24 मार्चनंतर पुन्हा अवकाळीचा पावसाचा इशारा…
रिवा इन्स्टाग्रामवर ऍक्टिव्ह असतेच सोबतच तिने उरी या बहुचर्चित व हिट ठरलेल्या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती. यानंतर तिने अनेक चित्रपट व म्युझिक अल्बम मध्ये काम केले आहे. अतिशय कमी वयात मोठी उंची गाठल्याने रिवाचे सर्वत्र कौतुक केले जाते.
पाकिस्तान, अफगाणिस्तामध्ये भूकंपाने 9 ठार तर 100 हून अधिक लोक गंभीर जखमी