
Maharashtra Employees Strike । मागील काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन, मराठा (Maratha Reservation) आणि ओबीसी समाजाचे आरक्षण (OBC Reservation) आंदोलन यावरून राज्याचे वातावरण ढवळून गेले आहे. यात आता भर पडली आहे ती जुनी पेन्शन योजनेची (Old Pension Scheme). जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आक्रमक झाले आहेत. (OPS)
OBC । ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून नवीन योजनेची घोषणा
राज्यात पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी आजपासून राज्यातील ७ लाख सरकारी कर्मचारी संपावर (Employees Strike) जाणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांची कामे खोळंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी म्हणजे मार्च २०२३ मध्ये कर्मचारी याच मुद्द्यावरून संपावर गेले होते. त्यामुळे राज्य सरकारने या निर्णयावर विचार करण्यासाठी माजी सनदी अधिकारी सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती. (Latest Marathi News)
मांडवगण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टराचे निलंबन करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
समितीने अहवाल देऊनही राज्य सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यामुळे सरकारी कर्मचारी नाराज झाले होते. संघटनांच्या समन्वय समितीने १४ डिसेंबरपासून पुन्हा राज्यव्यापी संप करण्याची घोषणा केली होती. कर्मचाऱ्यांनी १२ डिसेंबर नागपुरात महामोर्चा काढला होता. अशातच आता आजपासून हे कर्मचारी पुन्हा संपावर जाणार आहेत. त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Gutami Patil । आरक्षणाच्या वादात गौतमीची उडी, केलं मोठं वक्तव्य