Lumpy Disease । सरकारकडून पशुधनासाठी 170 कोटींचा खर्च, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

170 crore spent by the government on livestock, informed by Radhakrishna Vikhe Patil

Lumpy Disease । राज्यात कोरोना (Corona) महामारीनंतर लम्पी (Lumpy) या जीवघेण्या आजाराने थैमान घातले होते. या आजारामुळे अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. तसेच राज्यात दुधाचा प्रश्न निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी या आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. परंतु, आता पुन्हा एकदा या आजाराने (Lumpy Skin Disease) डोके वर काढले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पशुपालकांच्या चिंतेत भर पडली आहे. (Latest Marathi News)

Loan EMI । ग्राहकांना ‘या’ बँकांचा मोठा झटका! EMI च्या हप्त्यात केली वाढ

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 239 गावात 1 हजार 174 जनावरांना या आजाराची लागण झाली असून त्यापैकी 19 जनावरे गंभीर आहेत तर 53 जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय राहुरी,पाथर्डी, कोपरगाव आणि शेवगाव तालुक्यामध्ये लम्पी या आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पशुपालकांना आपल्या पशूंची काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

Success Story । सरकारी नोकरीला रामराम ठोकत पठ्ठ्यानं केली कोरफडीची शेती, आता करतोय कोट्यवधी रुपयांची उलाढाल

या आजाराची कमी वयाच्या जनावरांमध्ये जास्त तीव्रता असते. त्यामुळे आता पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणाची मोहीम व्यापक केली आहे. गेल्या लसीकरणाचा मोठा फायदा झाला होता. हा एक व्हायरल आजार असून जर लसीकरण आणि योग्य त्या वेळेत उपचार घेतले तर हा आजार बरा होऊ शकतो. पशुपालकांनी गोठे स्वच्छ ठेवून कीटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून केले जात आहे.

Gadar 2 Box Office Collection । आत्तापर्यंत गदर २ चित्रपटाने केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले आहे. “लम्पी आजारासाठी लागणाऱ्या मदतीसाठी सरकार पशुपालकांच्या पाठीशी आहे. पशुधनासाठी सरकारने आतापर्यंत 170 कोटी रुपयांचा खर्च केला आहे”, असे राज्याचे दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी स्पष्ट केले आहे.

Petrol Price । सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोलचे दर होणार कमी, सरकारचा मोठा निर्णय

Spread the love