Site icon e लोकहित | Marathi News

‘या’ कंपनीचं कफ सिरप घेतल्यानं 18 बालकांचा मृत्यू

18 children died after taking this company's cough syrup

कुठलाही आजार झाला की आपण मेडिकलमधूम सहज औषध घेऊन येतो. मात्र अनेकदा ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने न घेतल्याने धोकादाय ठरतात. आजार बरा करण्यासाठी आणलेलं औषध कधी कधी आजार वाढवून देखील टाकते. त्यातल्या त्यात लहान मुले ही प्रचंड नाजूक असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी औषध घेताना विशेष काळजी घ्यावी लागते. दरम्यान एका भारतीय फार्मा कंपनीने ( Indian Farma compony) बनवलेलं कफ सिरप घेतल्याने तब्बल 18 बालकांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर वार; म्हणाले, “अडीच वर्षे बाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा आणि…”

त्याच झालंय असं की, उझबेकिस्तान येथे भारतीय कंपनीने बनवलेलं कफ सिरप पिल्याने 18 बालकांचा मृत्यु झाला आहे. यामुळे या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उझबेकिस्तान सरकारने या कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू देखील केली आहे. 2012 मध्ये Dok1 Max हे कफ सिरप उझबेकिस्तानच्या बाजारात आणलं गेलं होतं. हेच कफ सिरप पिल्याने बालकांचा मृत्यु झाला आहे.

गौतमी पाटीलच्या डान्सवर माधुरी पवारची प्रतिक्रिया, म्हणाली, “तर कलाकाराच्या कलेचा आदर…”

Dok1 Max हे औषध उझबेकिस्तान मधील पालकांनी आपल्या मुलांना दिले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे हे औषध डाॅक्टरांच्या प्रिस्किप्शनशिवाय मुलांना दिले होते. अशी धक्कादायक माहिती तपासा दरम्यान समोर आली आहे. सध्या हे कफ सिरप भारतीय बाजारात विकले जात नसून जागतिक आरोग्य संघटनेने देखील या प्रकरणी लक्ष घातले आहे.

अंत्ययात्रेत ‘राम नाम सत्य है’ का म्हणतात तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version