सोलापूर: कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या अक्कलकोट (Akkalkot) आणि दक्षिण तालुक्यातील ग्रामस्थ कर्नाटकमध्ये जाण्यास तयार आहेत. महाराष्ट्रात राहून देखील आम्हाला सोयीसुविधा मिळत नाहीत मग इथे राहून काय उपयोग? आपल्या गावांचा कर्नाटकात समावेश झाला तर काय चुकीचे होईल? अशी भूमिका अक्कलकोट आणि दक्षिण तालुक्यातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
मोठी बातमी! दुधाच्या दरात पुन्हा ३ रुपयांनी दरवाढ
दरम्यान, आता सोलापूर जिल्ह्यामधील जवळपास 18 गावं कर्नाटकमध्ये जाण्यास उत्सुक आहेत. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाकऱ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे.
शेतकरी कुटुंबातील मुलाची यशाला गवसणी; MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊन झाला PSI
सोलापूर जिल्ह्यामधील केगांव बु., बरूर, चिंचपूर, टाकळी, कुरघोट, लवंगी, हत्तरसंग, कुडल, बोळकवठा, औराद,तेलगाव, कोर्सगांव, मुंडेवाडी, शेगाव, भंडारकवठे, धारसंग, कल्लकजोळकुमठे, केगांव खुर्द, चिंचोली नजीक, बाळगी, सुलेरजवळगे, तडवळ, इत्यादी गावं कर्नाटकमध्ये जाण्यास उत्सुक आहेत.
पाणीपट्टी थकल्यामुळे ग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांना थेट न्यायालयाची नोटीस; वाचा सविस्तर