BMW कंपनीने आता जागतिक स्तरावर आपली दुसरी पिढी म्हणजेच (Second generation) BMW M2 कारचे अनावरण केले आहे. ही कार एक कूप डिझाइन कार आहे. दरम्यान या कारचे बाहेरील आणि आतील भाग अनेक आधुनिक वैशिष्ट्यांनी बनवण्यात आले आहेत. BMW M2 कारच्या डिझाईनबद्दल खूप काही बोलण्यासारखे आहे. या कारच्या दोन्ही बाजूला LED DRL सह स्लिम एलईडी हेडलॅम्प, एक मोठा एअर डॅम, क्वाड-एक्झॉस्ट टिप्ससह स्क्वॅश्ड रिअर बंपर, किडनी ग्रिल, डिफ्यूझर, स्लिम एलईडी टेललाइट्स, 19-इंचाचा बंपर मिळतो. इतकंच नाही तर 20-इंचाची मागील चाके देण्यात आली आहेत.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! आता ई-पीक पाहणीसाठी ‘या’ तारखेपर्यंत वाढली मुदत
दरम्यान या कंपनीने आता नवीन BMW M2 मध्ये S58 पॉवर युनिट वापरले आहे. या कंपनीच्या सध्याच्या M3 आणि M4 कारमध्ये देखील हेच इंजिन देण्यात आले आहे. इतकंच नाही तर नवीन M2 मध्ये 3.0L ट्विन-टर्बो चार्ज केलेले इनलाइन आणि 6-सिलेंडर इंजिन आहे. दरम्यान हे इंजिन 453 bhp पॉवर आणि 550 न्यूटन मीटर कमाल टॉर्क निर्माण करते. तसेच या कारमध्ये पर्याय म्हणून 6-स्पीड मॅन्युअल आणि 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे.
राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय! अखेर 5 हजार कंत्राटी एसटी चालकांच्या भरतीची योजना रद्द
विशेष म्हणणे ही कार ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह केवळ 3.9 सेकंदात 0-60 mph पर्यंत वेग घेऊ शकते आणि M ड्रायव्हर पॅकसह कमाल 284 किमी/ताशी वेग वाढवू शकते. या कारला अनेक फीचर्स देण्यात आले असून यामध्ये सेकंड जनरेशन M2 ला 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 5 रंग पर्याय अल्पाइन व्हाईट, M-विशिष्ट नियंत्रणे आणि कॉन्फिगरेशन, ब्रुकलिन ग्रे मेटॅलिक, सॅफायर मेटॅलिक, एक नवीन एम झेड आणि एक नवीन एम. कार्बन बकेट स्पोर्ट सीट्स, टोरंटो रेड मेटॅलिक, iDrive 8 सॉफ्टवेअर, 14.9-इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रीनसारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
बंद फाईल पुन्हा उघडली! शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून अजित पवारांची चौकशी होणार