Site icon e लोकहित | Marathi News

Gadchiroli News । पोलिसांची मोठी कामगिरी! २ नक्षलवादी चकमकीत ठार, तासभर सुरु होता गोळीबार

Gadchiroli News

Gadchiroli News । गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांना (Naxal) ठार करण्यात गडचिरोली पोलिसांना मोठं यश मिळाल आहे. धानोरा तालुक्यात ही घटना घडली आणि पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये (Police vs Naxalites) सुमारे तासभर गोळीबार सुरू होता. या चकमकीनंतर पुढील ऑपरेशन्स आणि परिसराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. (Latest Marathi News)

Fire in railway station । धक्कादायक! रेल्वे स्थानकात भीषण आग, एकजण गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवाद्यांचा एक मोठा तुकडी तळ ठोकून आहे, अशी महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारवर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस दल परिसरात शोध घेत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. (Police Vs Naxalites)

Maratha Reservation । मराठा आरक्षणासाठी घेतला टोकाचा निर्णय, छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोर संपवलं जीवन

पोलिसांनीही नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. या गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी परिसरात झडती घेतल्याने एक AK47 आणि एक SLR शस्त्र घेऊन दोन पुरुष नक्षलवादी मृतदेह आढळून आले आहेत. मृत झालेल्या दोघांपैकी एकाची प्राथमिक ओळख सांगायची झाली तर तो कसनसूर दलमचा उप कमांडर दुर्गेश वट्टी आहे. दुर्गैश वट्टी हा 2019 मध्ये जांभूळखेडा स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता.

Supriya Sule । सर्वात मोठी बातमी! सुप्रिया सुळेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसद महारत्न’ जाहीर

Spread the love
Exit mobile version