Site icon e लोकहित | Marathi News

एका जागेसाठी 21 उमेदवार! कसबा विधानसभा पोटनिवडणुकी कोण कोण उतरलंय मैदानात? वाचा सविस्तर

21 candidates for one seat! Kasba Vidhan Sabha by-elections who has entered the field? Read in detail

पुण्यामध्ये कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर कसबा पोटनिवडणुक जाहीर झाली. ( Kasba Assembly Elections 2023) ही निवडणूक बिनविरोध होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र या निवडणुकीत चुरशीचा सामना रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कसब्यातील एका जागेसाठी तब्बल 21 उमेदवार मैदानात उतरले आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शिवसेना आक्रमक, आज होणार चक्का जाम आंदोलन

नुकतीच उमेदवारांच्या अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडली आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी एकूण 29 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 21 अर्ज निवडणूक कार्यालयाकडून मंजूर झाले आहेत. यामध्ये भाजपकडून ( BJP) हेमंत रासने, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर, संभाजी बिग्रेडकडून अविनाश मोहिते, आम आदमी पार्टीकडून किरण कद्रे, सैनिक समाज पार्टीकडून तुकाराम डफळ हे उमेदवार उभे राहिले आहेत.

मोठी बातमी! आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर पाठलाग करून हल्ला!

याशिवाय प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीकडून बलजितसिंग कोचर, अखिल भारतीय सेनेकडून मिलिंद कांबळे, राष्ट्रीय मराठा सेनेकडून रवींद्र वेदपाठक या उमेदवारांवर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच अभिजित बिचुकले यांच्यासह एकूण 13 उमेदवारांचे अपक्ष म्हणून अर्ज मंजूर झाले आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रमुख पक्षांनी चांगलीच कंबर कसली आहे. यामुळे ही निवडणूक रंजक ठरणार एवढं मात्र नक्की!

अभिनेत्री अमृता खानविलकरनं नवऱ्याला सोशल मीडियावर केलं ब्लॉक; जाणून घ्या कारण

Spread the love
Exit mobile version