Dombivli । एटीएम फोडण्याच्या नादात चोरट्यांचा फसला डाव, 21 लाखांची झाली राखरांगोळी

Dombivli

Dombivli । डोंबिवली : हल्ली चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. कधी दिवसाढवळ्या तर कधी रात्री चोरी होत आहे. यातील अनेक घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. (Crime) पण अनेक चोरट्यांचा चोरी करताना डाव फसतो. सध्या अशीच एक घटना घडली आहे. एटीएम फोडण्याच्या नादात 21 लाख रुपये जळून खाक झाले आहेत. (Dombivli Crime)

Amitabh Bachchan । चाहत्यांच्या चिंतेत वाढ! अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना डोंबिवलीतील महात्मा फुले रोड येथील आहे. तेथे असणाऱ्या साई बाबा चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन (ATM machine) असून शनिवारी रात्री चोरट्यांनी यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. चोरी करण्यासाठी हे चोरटे एटीएममध्ये शिरले खरे पण त्यांना एटीएम मशीन फुटली नाही. त्यामुळे त्यांनी गॅस कटरचा वापर केला. (Latest marathi news)

Bigg Boss 17 । बिग बॉस 17 चा विजेता होणार मालामाल, ट्रॉफी, रोख रक्कमेसह मिळणार ‘हे’ शानदार गिफ्ट

पण एटीएम मशीन कट करताना गॅसमुळे एटीएमला आग लागली. पाहता पाहता या आगीने उग्र रूप धारण केले. या आगीत मशीनमधील एकूण 21 लाख रुपये जळून खाक झाले. आग लागताच चोरटयांनी तिथून पळ काढला. त्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरून नेला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घटनेचा पंचनामा केला. घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Pune Crime । देवदर्शनाला पत्नीला घेऊन गेला अन् २५० फूट खोल दरीत फेकलं; भयानक घटनेने पुणे हादरलं

Spread the love