Accident News । भयंकर अपघात! एका क्षणात संपुर्ण उध्वस्त; तलावात ट्रॅक्टर कोसळून 22 जण जागीच ठार

Accident News

Accident News । एक भीषण अपघात (Accident) झाल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेत तब्बल 22 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळून ही धक्कादायक घटना (Tractor Accident) घडली आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. माघ पौर्णिमेच्या निमित्ताने दर्शनासाठी जाताना अपघात घडला आहे. (Latest marathi news)

Maharashtra Politics । काँग्रेसला नांदेडमध्ये मोठं खिंडार, 55 माजी नगरसेवकांनी दिला भाजपला पाठिंबा

उत्तर प्रदेशातील कासगंज येथे भीषण अपघात झाला असून मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एटाहून काही भाविक आज सकाळी कासगंजला जाताना ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली आणि अपघात झाला, तेव्हा ट्रॉलीमध्ये 25-30 लोक बसल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना पीडितांना वाचवलं.

Nagpur Firing News । गोळीबाराच्या घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला! घरात घुसून व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या

ट्रॅक्टर चालक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी झाली आणि ती थेट 7 ते 8 फूट खोल तलावात गेली. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

Raj Thackeray । राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “आज त्यांना…”

Spread the love