Site icon e लोकहित | Marathi News

Maharashtra Rain । राज्यात पुन्हा २४ तासांचा येलो अलर्ट जारी! पुणे, मुंबईसह २६ जिल्ह्यांना हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा

24-hour yellow alert issued again in the state! Meteorological department has warned 26 districts including Pune, Mumbai of heavy rain

Maharashtra Rain । महाराष्ट्रात (Rain in Maharashtra) मागील काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. पाऊस नसल्याने ठिकठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत. तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. जर आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. पाऊस (Rain) नसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाल्याचे दिसत आहे. (Rain,Latest Marathi News)

Tomato Price Hike | टोमॅटोमुळे लागली लॉटरी! दिवसाला चक्क 18 लाखांची कमाई

अशातच आता शेतकरीवर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आज पुन्हा एकदा पावसाने चांगलाच जोर धरला आहे. आज सकाळपासून पावसाची राज्यात चांगलीच बॅटिंग सुरु आहे. हवामान खात्याकडून (IMD Alert) पुणे,मुंबईसह अनेक जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार (IMD)पुढील २४ तास महत्त्वाचे असून २६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Amruta Fadnavis । अमृता फडणवीस पुन्हा चर्चेत; ‘त्या’ फोटोंमुळे झाल्या ट्रोल

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, रायगड, अहमदनगर, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर तसेच औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो.

नाट्यमय घडामोडीनंतर खाते वाटप जाहीर! जाणून घ्या अजित पवार यांच्यासह कोणाला कोणते खाते मिळाले

त्यामुळे आता नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावं अशा सूचना हवामान खात्याकडून (Department of Meteorology) देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या २४ तासात जर पावसाने हजेरी लावली नाही तर शेतकऱ्यांवर खूप मोठे संकट येऊ शकते.

सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या पत्नी शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Spread the love
Exit mobile version