राज्यसरकारने नुकत्याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे ऊस उत्पादन शेतकऱ्यांमध्ये खुशीचे वातावरण आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यातील कारखाने सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उसाचा दर किती असणार याकडे देखील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व किसन वीर-खंडाळा कारखान्याकडे गळीत हंगाम 2022-23 मध्ये ऊसाची पहिली उचल जाहीर केली आहे.
चक्क लोकांनी उचलले घर; ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
या कारखान्यात गाळपाकरिता येणाऱ्या उसास प्रतिटन 2500 रुपये एवढी पहिली उचल दिली जाणार आहे. अशी माहिती कारख्यान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील ( Makrand Patil) यांनी दिली आहे. किसनवीर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी किसनवीर कारखान्याची पहिली उचल 2350 रुपये असणार आहे अशी माहिती जिल्ह्यातील दैनिकांत प्रसिध्द करण्यात आली होती.
“फक्त बारामतीकरांच्या विरोधात भुंकण्यासाठीच…”, विद्या चव्हाण यांची गोपीचंद पडळकरांवर जोरदार टीका
यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता कारख्यान्याचे चेअरमन मकरंद पाटील यांनी उचल जाहीर केल्याने हा संभ्रम मिटला आहे. दरम्यान गळीत हंगामाच्या अखेरीस एफआरपीनुसार (FRP) जो अंतिम दर निघेल त्यानुसारच किसन वीर कारखान्याचा अंतिम दर राहणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. तसेच ऊसबिलाच्या पहिल्या पंधरवड्याचे बिल लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. अशी खुशखबर कारखान्याकडून देण्यात आली आहे.
धक्कादायक! पाटस येथे ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती, पत्नी अन् ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू