Site icon e लोकहित | Marathi News

‘या’ योजनेंतर्गत मुलीच्या लग्नासाठी मिळणार 27 लाख रुपये; वाचा सविस्तर

27 lakh rupees for the marriage of a girl child under this scheme; Read in detail

केंद्र सरकार आणि राज्य सरकार सामान्य जनतेला आर्थिक दृष्ट्या मदत मिळावी म्हणून अनेक योजना राबवत असते. यामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी देखील नवनवीन योजना राबवल्या जात आहेत. ज्याचा महिलाही मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. बेटी बचाओ, बेटी पढाओ मिशनला बळ देण्यासाठी सरकार मुलींना मदत करत आहे.

खुशखबर! आता आधार कार्डद्वारे देशभरात कुठेही घेता येणार रेशन कार्डवरील धान्य, वाचा सविस्तर माहिती

तुम्हाला मुलगी असेल तर तिच्या लग्नाचं टेन्शन घेऊ नका. सरकारने यासाठी भन्नाट योजना आणली आहे. या योजनेतून तुम्हाला इतके पैसे मिळतील की तुम्ही तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न आरामात करू शकाल. सरकारने सुरू केलेली या योजना एलआयसीने सुरु केली आहे. या योजनेचे नाव कन्यादान योजना आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला थोडीफार गुंतवणूक करावी लागेल. ही एलआयसी पॉलिसी फक्त मुलींच्या लग्नासाठी चालू केली आहे.

मोठी दुर्घटना! मुंबईतील गिरगावमधील गोदामात आग लागून १४ गाड्या जळून खाक

तुम्हाला एलआयसीच्या या प्लॅनमध्ये खाते उघडायचे असेल तर काही कागदपत्रे लागतील –
१) आधार कार्ड
२) उत्पन्नाचा पुरावा
३) ओळखीचा पुरावा
४) पासपोर्ट आकाराचा फोटो
ही सर्व कागदपत्रे तुम्हाला खाते उघडण्यासाठी लागतील जर या कागदपत्रांपैकी कोणतेही कागदपत्र गहाळ असल्यास तुमचे एलआयसी कन्यादान पॉलिसी खाते उघडले जाणार नाही.

नेमकं मुरघासाचे फायदे आणि तोटे कोणते? वाचा याबद्दल साविसर माहिती

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?

या योजनेचा लाभ हेण्यासाठी तुमची मुलगी एक वर्षाची असावी आणि तुमचे किमान वय 30 वर्षे असावे तर तुम्ही पॉलिसीचा लाभ घेऊ शकता. ही एलआयसी कन्यादान पॉलिसी 25 वर्षांची योजना असूनतुम्हाला 22 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. या योजनेमध्ये जर तुम्ही दररोज 125 रुपये गुंतवले तर तुम्हाला 27 लाख रुपयांचा फायदा होईल. ही योजना 25 वर्षांसाठी असून तुम्हाला फक्त 22 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.

VIDEO: रुग्णालयाच्या परिसरात पत्नी आणि गर्लफ्रेंडची जोरात हाणामारी, मग काय नवऱ्याने दोघांनाही चोपल चप्पलने

Spread the love
Exit mobile version