मुंबई : यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जुलै ते ऑगस्ट या दरम्यान शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. म्हणून शेतकऱ्यांना (farmers) राज्य सरकारकडून (state government) 3 हजार 500 कोटींची मदत (funds) जाहीर करण्यात आली आहे. तसेच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी दिली.
Aryan Khan: आर्यन खानच्या प्रेमात पडली ‘ही’ पाकिस्तानी अभिनेत्री, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, मागच्या सरकारच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी नव्हता. पण आत्ताच्या सरकारने यावर्षी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (compensation for damages) दिली आहे.
केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत मुलींना मिळणार ५१ हजार रुपये; असा करा अर्ज
गोगलगायींमुळे लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले होते. कारण सोयाबीनचे पिक वाढीला लागताच गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला आणि यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यामुळे मोठ्या प्रमाणात
नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्यावेळी राज्य शासनाकडून या 3 जिल्ह्यांतील नुकसानग्रस्तांना तब्बल 98 कोटी 58 लाख इतकी मदत जाहीर केली असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.