
दौंड : रावणगाव (Ravangaon) येथे टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच ते सहा महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Raja Hindustani: आता असा दिसतोय राजा हिंदुस्थानीमधील ‘हा’ बालकलाकार
जखमी रुग्णांना दौंड (Daund) व भिगवण (Bhigwan) या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले असून हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्यामुळे ट्रॉलीत बसलेल्या महिला त्या खाली सापडल्या असून गंभीर जखमी झाल्या आहेत.
cup syrup: कफ सिरपमुळे लहान मुले दगावली, राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
या ट्रॉलिमध्ये नऊ महिला होत्या. यामध्ये उपचारादरम्यान तीन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या महिलांची नावे रेश्मा भाऊ पानसरे, सुरेख बाळू पानसरे व अश्विनी प्रमोद आटोळे अशी नावे आहेत.