आनंदाची बातमी ! 30 हजार शिक्षकांची शिक्षक भरती होणार

मागील अनेक दिवसांपासून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या भरत्या रखडल्या गेल्यामुळे शिक्षकवर्ग नाराज होता. परंतु, राज्य सरकारने येत्या शैक्षणिक वर्षात तब्बल 30 हजार शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती करण्याचे जाहीर केले आहे. यामुळे शिक्षकवर्गाला दिलासा मिळाला आहे. याबाबतची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिलीप केसरकर ( Dilip Kesarkar) यांनी विधानसभेत दिली.

फिनोलेक्स कंपनीची कौतुकास्पद कामगिरी; शेतकऱ्यांसोबत साजरा केला राष्ट्रीय किसान दिवस

सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बोलताना शालेय शिक्षणमंत्री दिलीप केसरकर यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या भरतीबाबत माहिती दिली. ( Teacher Recruitment) सध्या विद्यार्थ्यांची आधार लिंकिंग प्रक्रिया सुरू असून यामध्ये विद्यार्थ्यांची एकूण संख्या कळणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर 30 टक्के भरती केली जाईल. इतकच नाही तर परवानगी मिळाली तर 100 टक्के भरती करण्याची तयारी शिक्षणविभागाची आहे.
असे दिलीप केसरकर म्हणाले आहेत.

अन्यथा सरकारी कार्यालयासमोर संसार मांडू -रमेश भाई खंडागळे

तसेच 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाबाबत बोलताना शालेय शिक्षणमंत्री दिलीप केसरकर म्हणाले आहेत की, ” 20 आणि त्यापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्यात येणार नाहीत. काही दिवसांपूर्वी 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांबाबत सर्वेक्षण केले त्यामुळे लोकांचा असा समज झाला. परंतु, सरकार तसा कुठलाच विचार नाही. दर्जेदार शिक्षण देणे हिच सरकारची प्राथमिकता असेल.”

बिबट्या मुलीला जंगलात घेऊन जात आहे पाहून आईने फोडला हंबरडा ; जंगली प्राण्याकडून प्राणघातक हल्ला …

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *