Pune: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 31 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

31 thousand women recite Atharvashirsha in front of Shrimant Dagdusheth Halwai Ganpati

पुणे : दोन वर्षांनंतर लाडक्या बाप्पाचं धूमधडाक्यात घरोघरी आगमन झालं आहे. सगळ्या गणेश भक्तांमध्ये आनंदच आनंद निर्माण झाला आहे.दरम्यान आज पुण्यातील ऋषिपंचमीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे अर्थवशीर्ष पठण करण्यात आले.’ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि..’ असे 31 हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठण केले.

Shivsena: हे गणराया देशाला ‘निर्भय’ कर, बाप्पाकडे प्रार्थना करत शिवसेनेने भाजपला टोला लगावला

हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केले.आणि आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यावेळी उपस्थित होत्या.विशेष म्हणजे या अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदाच ३५ वं वर्ष आहे.या कार्यक्रमाला ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव आदी मान्यवरही उपस्थित होते.

दुसऱ्याचं दिवशी का करतात बाप्पाचे विसर्जन? दीड दिवसाचा गणपती म्हणजे नेमकं काय? जाणुन घ्या!

आजची पुणेकरांची पहाट गणेश नामाच्या जयघोषाने महिलांनी केलेल्या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमामुळे मंगलमय झाली. हा उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता.यावेळी अनुराधा पौडवाल म्हणाल्या, जगद्गुरू शंकराचार्य रचित सौंदर्य लहरीचे पठण मी केले आहे. धर्म बळकट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे पठण आपण सर्वानी एकत्रितपणे नक्की करूया.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *