Politics News । अवघ्या काही दिवसांवर लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election 2024) येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच निवडणुकीपूर्वी काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या ३२ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. या नेत्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला आहे. (Latest marathi news)
Jayant Patil । “…त्याशिवाय जागावाटप जाहीर करणार नाही” जयंत पाटील यांचे सर्वात मोठे वक्तव्य
निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेससाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांचे निकटवर्तीय, माजी कॅबिनेट मंत्री लालचंद कटारिया यांच्यासह पक्षाच्या ३२ नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात या नेत्यांचा पक्ष प्रवेश पार पडला.
Ravindra Waikar । उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! आमदार रवींद्र वायकर करणार शिंदे गटात प्रवेश
यात माजी आमदार रिछपाल मिर्धा,लालचंद कटारिया, राजेंद्र यादव, विजयपाल मिर्धा, खिलाडीलाल बैरवा, अलोक बेनीवाल, भीलवाडाचे माजी जिल्हाध्यक्ष रामपाल शर्मा यांचा समावेश आहे. जसे कटारिया हे गहलोत यांचे निकटवर्तीय आहेत, तसेच खिलाडीलाल बैरवा हे सचिन पायलट यांचे निकटवर्तीय आहेत. रामपाल शर्मा हे माजी विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांचे निकटवर्तीय समजले जातात.