मुलींच्या लैंगिक शोषण केल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सध्या देशाला श्रध्दा वालकर (Shraddha Walker) हत्याकांडाने हादरवल आहे. आता पुन्हा एक अशीच धक्कदायक घटना समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एका शाळेमध्ये इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आलं आहे.
Milk Price: ‘या’ डेअरीने दुधाच्या दरात केली वाढ; वाचा सविस्तर
शाळेतील एका सफाई कामगाराने विद्यार्थिनीसोबत हा गैरप्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केली असून गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाची संपूर्ण माहिती समोर आलेली नाहीये.
एकतर्फी प्रेमातून तरुणाने उचलले मोठे पाऊल; स्वतःला पेटवून घेत तरुणीला मारली मिठी
दरम्यान, दिल्लीमध्ये (Delhi) विद्यार्थिनीवर अत्याचार व्हायची ही पहिलीच वेळ नाही याआधी देखील अशा बऱ्याच घटना समोर आलेल्या आहेत. याच वर्षी 6 ऑक्टोबरला दिल्लीच्या केंद्रीय विद्यालयात 11 वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली होती.
पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोरच हावलदाराला मारहाण; व्हिडिओ होतोय व्हायरल