Political News । उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! बड्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Political News

Political News । राज्यात लवकरच निवडणुका (Loksabha Election 2024) पार पडणार आहेत. सर्व पक्ष आतापासून तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला (Uddhav Balasaheb Thackeray group) मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेत (Shivsena) बंड झाल्यापासून ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. नागपूर येथे सुरू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या बड्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Latest Marathi News)

ST Mahamandal । भारीच! खिशात एकही रुपया नसताना करता येणार लालपरीने प्रवास, कसं ते जाणून घ्या

पालघर नगरपरिषदेचे नगरसेवक उत्तम घरत, दिनेश घरट, सुभाष पाटील, आणि बंड्या वडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. याशिवाय आणखी आठ नगरसेवक शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच लातूरचे ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Pune News । पर्यटन बेतलं जीवावर! तरुणाचा १२०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू

गेल्या वर्षभरात पालघर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकामध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा पराभव सहन लागला होता. त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत शिंदे गटाने पक्ष बांधणीवर भर दिला आहे. निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाला सोडून गेल्याने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे.

Mahadev Betting App । मोठी बातमी! महादेव बेटिंग ॲपच्या मालकाला पोलिसांकडून अटक

Spread the love