मुंबई : सध्या राज्यातील 23.14 लाख शेतकरी (Farmers) नियमित कर्जदार (Regular borrowers) आहेत. दरम्यान आता या शेतकऱ्यांसाठी तीन टप्प्यांत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहेत. हे अनुदान (grant) तीन टप्प्यात मिळणार आहे. दरम्यान याची पहिली यादी प्रसिद्ध झाली असून त्यात 8 लाख 29 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. या यादीत सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील 42 हजार 647 शेतकरी आहेत. दरम्यान या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 200 कोटी रुपये मिळणार आहेत.
अमूल दूध दरात प्रतीलिटर ‘इतक्या’ रूपयांनी वाढ; दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना महागाईचा झटका!
या शेतकऱ्यांना दोन दिवसांत आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर 18 ऑक्टोबरला अनुदान रक्कम वितरित केली जाईल. तसेच आता राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणूक सुरू झाल्या आहेत. त्यामुळे तेथील जवळपास 14 लाख 85 हजार शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये अनुदान मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटात नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. पण अजूनही त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नव्हते. दरम्यान आता सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मागच्या तीन वर्षांतील कोणत्याही दोन वर्षांत कर्जाची परतफेड केलेल्यांना हा लाभ दिला जाईल. ही रक्कम बॅंकांनी कर्जापोटी वर्ग करून घेऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या बचत खात्यात ही रक्कम वितरित केली जाईल. शेतकऱ्यांना जवळपास 12 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. अडचणीतील जिल्हा बॅंकांचीही थकबाकी कमी होण्यास मदत होणार आहे. यामध्ये पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर, सोलापूर या जिल्हा बॅंकांना सर्वाधिक रक्कम मिळणार आहे.
आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होणार ऊस परिषद, ऊस उत्पादकांचे राजू शेट्टींच्या घोषणेकडे लागले लक्ष
अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वीच…
यंदाच्या वर्षी बहुतेक जिल्ह्यांमध्ये सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये जवळपास 21 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून सरकारने चार हजार कोटी रुपये दिले आहेत. दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार आहे. इतकंच नाही तर ज्या जिल्ह्यांमध्ये 65 मिलिमीटरपेक्षा अधिक व सततचा पण 65 मिलिमीटरपेक्षा कमी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांनाही भरपाई दिली जात आहे.
Rohit Pawar: बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पुढं यावं – रोहित पवार
या तीन टप्प्यात मिळेल अनुदान
पहिला टप्पा – 8.29 लाख शेतकरी – 4,000 कोटी रुपये
दुसरा टप्पा – 10 लाख शेतकरी – 5,000 कोटी रुपये
तिसरा टप्पा – 4.85 लाख शेतकरी – 1,200 कोटी रुपये