Fire News । काल रात्री मोठी दुर्घटना घडल्याची घटना समोर आली आहे. एका 7 मजली इमारतीला भीषण आग (Fire) लागली. या आगीमध्ये 44 नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर 22 जण जखमी झाले आहेत. या घटनेबाबत आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.(Latest Marathi News)
LPG Price । सर्वसामान्यांना सरकारचा मोठा धक्का! एलपीजी सिलिंडरमध्ये झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ
बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका सात मजली इमारतीला भीषण आग (Fire in Dhaka) लागली आहे. आरोग्य मंत्री डॉ. सेन यांनी घटनास्थळी पहाटे 2 वाजता भेट दिली. बांगलादेश अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री 9:50 च्या सुमारास आग लागली (Building fire) आणि ही आग काही क्षणातच वरच्या मजल्यापर्यंत पसरत गेली. यात रेस्टॉरंटसह कपड्यांचं खूप नुकसान झालं आहे.
गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत 44 जणांचा मृत्यू झाला.या आगीतून अग्निशमन दलाने 75 लोकांना बाहेर काढलं असून त्यापैकी 42 लोक बेशुद्ध झाले आहेत. अग्निशमन दलाच्या 13 तुकड्या तैनात केल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. काही क्षणातच होत्याच नव्हतं झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ajit Pawar । बिग ब्रेकिंग! शिंदे गटाचा बडा नेता अजित पवार गटात जाणार?