गुजरातमध्ये उसाला ४७०० भाव, मग महाराष्ट्रात २९०० एफआरपी का?, रघुनाथदादा पाटलांचा सरकारला सवाल

4700 FRP for sugarcane in Gujarat, then 2900 FRP in Maharashtra?, Raghunathdada Patal asked the government

नुकतेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetti) यांनी शेतकऱ्यांना कमी एफआरपी देण्यासंदर्भात मोठे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर आता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील ( Raghunathdada Patil) यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायमच शेतकरी विरोधी भूमिकेत राहिले आहेत,” असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

शिंदे-फडणवीस-ठाकरे एकत्र येणार? राज्यात नव्या युतीची नांदी! चर्चाना उधाण

सरकारने शेतकऱ्यांना ऊसउत्पादन शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे राज्यात ऊस आंदोलनाला जोर धरला आहे. गुजरातमध्ये मागच्या वर्षी शेतकऱ्यांना 4,700 रुपये, उत्तरप्रदेशात 3,500 रुपये इतका एफआरपी देण्यात आला. परंतु महाराष्ट्रात ( Maharashtra) फक्त 2900 रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडले. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असे रघुनाथदादा पाटील म्हणाले आहेत.

IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताचा ७१ धावांनी दणदणीत विजय

इतकेच नाही तर टनामागे ‘आरएसएफ’चा फरक ६०० रुपये कसा राहतो, असा प्रश्नही रघुनाथदादा यांनी उपस्थित केला आहे. कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांची करत असलेली पिळवणूक ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या झाली आहे. यावरून मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

वासुदेव नाना काळे यांची लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत लोकसभांच्या “क्लस्टर सहप्रभारी” म्हणून निवड!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *