Ola S1 X । वाहन निर्माता कंपनी ओला (Ola) सतत इतर कंपन्यांना टक्कर देत असते. कंपनी आपल्या सर्व स्कुटरमध्ये जबरदस्त फीचर्स आणि रेंज देत असल्याने या कंपनीच्या (Ola Electric Sooter) ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे. बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Sooter) मागणी झपाट्याने वाढली आहे. हीच मागणी लक्षात घेता आता कंपनीने आपल्या एकदम 5 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. (Latest Marathi News)
ग्राहकांसाठी सर्वात आनंदाची बाब म्हणजे कंपनीच्या या स्कुटर्स मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत (Ola S1 X Price) खरेदी करता येतील. (Ola S1 X Offer) कंपनीने आता आपले OLA S1X आणि Ola S1 सीरिजमधील स्कूटरची दुसरी पिढी लॉन्च केली आहे. जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असेल. जाणून घ्या किंमत आणि ऑफर.
Jayakwadi Dam Water Storage । मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट, जायकवाडी धरणात फक्त 34 टक्के पाणीसाठा
किंमत
कंपनीकडून नवीन OLA S1X एकूण तीन प्रकारांत सादर करण्यात आली आहे, ज्यामध्ये S1X, S1X (3kWh) आणि S1X (2kWh) यांचा समावेश केला आहे. या नवीन स्कुटरची किंमत अनुक्रमे 1,09,999 रुपये, 99,999 रुपये आणि 89,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. जर तुमचे बजेट इतके नसेल तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही ती मूळ किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करू शकता. जर तुम्ही ही स्कुटर 21 ऑगस्टपूर्वी त्या बुक केली तर त्यांची किंमत अनुक्रमे 99,999 रुपये, 89,999 रुपये आणि 79,999 रुपये इतकी असेल.
रेंज
स्कुटरच्या रेंजचा विचार केला तर ही स्कूटर एका चार्जमध्ये 151 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. नवीन S1 X ची डिलिव्हरी सप्टेंबरपासून, S1 X 3kWh आणि S1 X 2kWh च्या डिलिव्हरी डिसेंबरपासून सुरू होईल.
Agriculture News । शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शेततळ्यासाठी अर्ज सुरु; ‘या’ ठिकाणाहून करा अर्ज