Chhatrapati Sambhaji Nagar Fire । छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) हँडग्लोव्हज बनवणाऱ्या कंपनीला (Hand Gloves Company) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. कंपनीमध्ये काम करणाऱ्या २० ते २५ कामगारांपैकी १० कामगार कंपनीमध्येच राहत होते. रात्री कामगार झोपले असताना अचानक आग लागली. यावेळी बाहेर पडता न आल्याने 6 कामगारांचा मृत्यू झाला तर काही कामगारांनी पत्रे उचकटत बाहेर पडल्याने बचावले. (Latest marathi news)
Apple days sale । सोडू नका अशी संधी! iPhone 15 वर मिळतेय थेट 30 हजारांची सवलत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मृत कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये मिळणार आहेत. जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशा सूचना शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. या दुर्दैवी दुर्घटनेवर शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. कंपनी मालकासह ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी आक्रमक मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी केली आहे.
Crime News । पोलिसांची मोठी कारवाई, ड्रग्जसह रेव्ह पार्टीतून 100 जणांना घेतले ताब्यात
“राज्यातील औद्योगिक परिसरात सतत मनुष्य हानीचे अपघात होत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व कामगार विभाग अशा दुर्दैवी घटना घडत असताना कोणतेही सुरक्षेची काळजी घेत नाही असे पाहायला मिळत आहे. अशीच घटना संभाजीनगर येथील वाळुज एमआयडीसीतील सनराईस एटरप्राईज या कंपनीत घडली आहे,” असे दानवे ट्विट करत म्हणाले आहेत.