मुंबई : भाजप नेत्या आणि टिक-टॉक स्टार सोनाली फोगटच्या (Sonali Phogat) हत्येप्रकरणी अजून एका व्यक्तीला गोव्यात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार शनिवारी रात्री एका ड्रग डीलरला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, गुरुवारी अटक करण्यात आलेल्या हरियाणा भाजप नेत्याचे सहकारी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सिंग आणि सागवान यांच्यावर खुनाचा आरोप आहे, तर रेस्टॉरंट मालक आणि ड्रग विक्रेत्यावर अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्यांतर्गत आरोप लावले आहेत.
Corona: कोरोनाबाबत दिलासादायक, रुग्णांची संख्या ‘इतक्या’ पटीने मंदावतेय
या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत २५ हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. ज्यामध्ये रेस्टॉरंटचे कर्मचारी आणि फोगट राहत असलेल्या रिसॉर्टमधील लोकांचा समावेश आहे. याशिवाय त्यांना मृत घोषित करण्यात आलेल्या रुग्णालयातील कर्मचारी आणि चालकाचीही चौकशी करण्यात आली आहे.
गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली फोगटला मृत्यूपूर्वी ‘मेथाम्फेटामाइन’ नावाचे औषध देण्यात आले होते. गोव्याचे पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी सांगितले की, अंजुना कर्लीज रेस्टॉरंटमध्ये सोनाली फोगटला दिलेला उरलेला अमली पदार्थ रेस्टॉरंटच्या वॉशरूममधून जप्त करण्यात आलाय.
PM Modi: पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून चाळीसगावमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार