Rozgar Mela । रोजगार मेळा या उपक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 51 हजार तरुणांना सरकारी नोकऱ्यांची नियुक्ती पत्र देणार आहेत. आज हा रोजगार मेळा संपूर्ण देशभरातील एकूण 45 ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10:30 वाजता पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video conferencing) रोजगार मेळाव्याच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रं सुपूर्द करणार आहेत. (Latest Marathi News)
या रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमांतर्गत सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), सशस्त्र सीमा बल (SSB), आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), इंडो तिबेटीयन बॉर्डर यासारखे वेगवेगळ्या सशस्त्र पोलीस दल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि दिल्ली पोलीस भरती या अंतर्गत नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. (Appointment Letter under Rozgar Mela)
Crime News । भयानक! रमी सर्कल गेममुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर, घेतला टोकाचा निर्णय अन्….
याबाबत नुकतेच पीएमओने (PMO) निवेदन जारी केले आहे. निवेदनामध्ये असे म्हटले आहे की रोजगार मेळा हा युवकांच्या सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल उचलले आहे, ज्या अंतर्गत देशाच्या विकासात तरुणांना संधी उपलब्ध करून देण्यात येईल. IGOT कर्मयोगी पोर्टलवर नवनियुक्त तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल. या पोर्टलवर 400 पेक्षा जास्त ई-लर्निंग अभ्यासक्रम उपलब्ध केले आहेत.