Maharashtra Politics । नांदेड : काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. त्यांच्या भाजपमध्ये जाण्यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) मोठी पोकळी निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. याचा परिणाम काँग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये होईल. पण अजूनही काँग्रेसला लागलेली गळती संपली नाही. कारण 55 माजी नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. (Latest marathi news)
नांदेडमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या तब्बल 55 माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांना पाठिंबा दिला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाला लागलेली गळती काँग्रेसला थांबवता येईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Raj Thackeray । राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “आज त्यांना…”
दरम्यान, नांदेड महापालिकेच्या मागील निवडणुकीत निवडून आलेल्या 81 पैकी 73 नगरसेवक हे काँग्रेसचे होते आणि यापैकी 55 माजी नगरसेवकांनी अशोक चव्हाण यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळं आता नांदेड नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे इतर आमदार अशोक चव्हाण यांना पाठिंबा देतात का ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.