महिन्याला 60 हजार पगार, घरही मोफत! तरीही या कारणामुळे अनेकजण करत नाहीत ‘ही’ नोकरी

60 thousand salary per month, free house too! Yet many do not do 'this' job for this reason

सध्या अनेकांच्या नोकऱ्या (Job) धोक्यात आल्या आहेत. अनेक दिग्गज कंपन्या आपल्या कामगारांना घरचा रस्ता दाखवत आहेत, त्यामुळे अनेकजण आहे त्या कंपनीत (Company) कमी पगारात नोकरी करत आहेत. परंतु अशाही काही कंपन्या आहेत ज्या आपल्या कर्मचाऱ्यांना गलेगठ्ठ पगार देतात. तसेच ते कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक सुविधा उपलब्ध करून देत असतात. (Latest Marathi News)

शेतकरी संकटात असताना काही टोळ्यांची हप्तेखोरी सुरु, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांचा घेराव

सध्या एका नोकरीची चांगलीच चर्चा सुरु आहे. ही कंपनी कर्मचाऱ्यांना महिन्याला 60 हजार पगार देत आहे. इतकेच नाही तर कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी मोफत घर देत आहे. तरीही अनेकांना या ठिकाणी नोकरी करू वाटत नाही. वाचून तुम्हालाही धक्का बसला असेलच ना. याला कारणही तसेच आहे. दरम्यान, ही कंपनी चीनमधील असल्याचे बोलले जात आहे.

Weather Update । देशासह राज्यात आठवडाभर कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला इशारा

कंपनीच्या एका अटीमुळे अनेकजण या कंपनीत नोकरी करण्याचे टाळतात. चीनच्या दक्षिणेकडील शेनझेनमधील एका कंपनी ऑपरेशन्स आणि मर्चेंडायझर्सच्या भूमिकेसाठी कामगार शोधत आहे. त्यासाठी कंपनी 50000 युआन म्हणजेच महिन्याला एकूण 60 हजार रुपये पगार देत आहे. त्याशिवाय त्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी मोफत घर देण्यात येणार आहे.

उद्धव ठाकरेंना ‘मशाल’ मिळणार? सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष

परंतु या कंपनीत नोकरी करायची असेल तर तो कर्मचारी शाकाहारी असावा अशी अट कंपनीने ठेवली आहे. कंपनीच्या या अजब अटीमुळे अनेकजण या ठिकाणी नोकरी करण्याचे टाळतात. सध्या सोशल मीडियावर या नोकरीची चर्चा सुरु आहे.

Maharashtra Assembly Session । विधिमंडळात राष्ट्रवादीचे कार्यालय जैसे थे, अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र बसणार?

Spread the love