Mobile Addiction । अलीकडच्या काळात स्मार्टफोनचा (Smartphone) वापर खूप वाढला आहे. अनेक कामे स्मार्टफोनच्या मदतीने (Smartphone Use) चुटकीसरशी होऊ लागली आहेत. त्यामुळे वेळेची बचत होऊ लागली आहेत. एका मिनिटात असंख्य माहिती उपलब्ध होत आहेत. स्मार्टफोन हा केवळ ज्ञान आणि मनोरंजनाचे साधन राहिले नाही, तर त्याच्या माध्यमातून कमाईदेखील करता येत आहेत. (Latest Marathi News)
लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींकडे स्मार्टफोन पाहायला मिळतात. काहीजणांकडे तर दोन-दोन स्मार्टफोन असतात. धक्कादायक बाब म्हणजे खेळण्या-बागडण्याच्या वयात कित्येक तास ही लहान मुलं फोन (Smartphone Addiction) पाहत बसतात. त्यामुळे त्यांच्यात चिडचिडेपणा आणि आळशीपणा वाढत चालला आहे. याबाबत नुकताच लोकल सर्कल्स नावाच्या संस्थेने सर्व्हे केला आहे. त्यात ही माहिती समोर आली आहे.
Sharad Pawar । “शरद पवार कधीही कुणाशी युती करू शकतात”; शिंदे गटाच्या नेत्याचं खळबळजनक विधान
शहरी भागातील तब्बल 61 टक्के लहान मुलांना मोबाईलचं व्यसन लागलं असून या सर्वेक्षणात 296 जिल्ह्यांतील 46,000 हुन जास्त पालकांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात 61 टक्के पालकांनी असं सांगितलं की, त्यांची मुलं दिवसातून 3 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल घेतात. बराच वेळ ते गेमिंग किंवा सोशल मीडिया वापरतात. 39 टक्के पालकांनी असं सांगितलं की, त्यांची मुलं दिवसातून 1 ते 3 तास मोबाईल घेतात. 46 टक्के पालकांनी असं सांगितलं की, त्यांची मुलं दिवसातून 3-6 तास मोबाईल घेतात, तर 15 टक्के पालकांनी हे प्रमाण 6 तासांपेक्षा जास्त आहे, असे सांगितलं.
Vaidyanath Sugar Factory । पंकजा मुंडेंना मोठा दणका! तब्बल 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
त्यामुळे मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांना सोशल मीडिया, ओटीटी किंवा गेमिंग प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पालकांची परवानगी घेणं बंधनकारक करायला पाहिजे, अशी मागणी आता पालकांकडून जोर धरू लागली आहे.