Vidharbha Rain Update । नागपूर : राज्यात यावर्षी पावसाने (Rain in Maharashtra) उशिरा आगमन केले आहे. परंतु मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. (Latest Marathi News)
Bike Loan | खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! आता सोप्या पद्धतीने मिळणार दुचाकीसाठी कर्ज
हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचा रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट तर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातही (Vidharbha) रेड अलर्ट दिला असून या ठिकाणी मागील तीन ते चार दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. संपूर्ण विदर्भाला 48 तासात पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे येथील नदी-नाल्यांना पूर आला आहे.
विदर्भात वीज पडून सात जणांचा मृत्यू झाला झाला आहे तर एक जणाचा भिंत कोसळून मृत्यू झाला आहे. अजूनही पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तिघा जणांचा शोध लागला नाही. त्याशिवाय वेगवेगळ्या विविध ठिकाणी वीज पडून 30 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. त्यामुळे जर तुमचे महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.