Site icon e लोकहित | Marathi News

Eknath Shinde: सीएम शिंदेंवर आक्षेपार्ह टिप्पणी करणं भोवलं, 8 शिवसैनिकांची जेलमध्ये रवानगी

8 Shiv Sainiks sent to jail for making offensive comments on CM Shinde

मुंबई : डोंबिवलीतील शहापूरमधील 8 शिवसैनिकांवर पोलिसांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm shinde) यांच्या बद्दल सोशल मीडियावर अपशब्द वापरल्याप्रकरणी जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. शहापूरमधील 8 शिवसैनिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामधील 4 शिवसैनिकांची (shiv sainik) 14 ऑक्टोंबरपर्यंत थेट आधरवाडी जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तर चार सैनिकांची वैयक्तीक जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

उर्फीचा टॉपलेस व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी घेतला समाचार; पाहा VIDEO

मागच्या दोन दिवसांपूर्वी शिवतीर्थ येथे दसरा मेळाव्यासाठी जात असताना शिवसैकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दिलेल्या घोषणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाला होता. यानंतर शिंदे समर्थकांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली असल्याने पोलिसांनी शिवसैनिकांवर कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे.

Udayanraje Bhosale: “…नाहीतर वाडगं घेवून बसायला लागेल”, कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात उदयनराजे भोसलेंनी व्यक्त केले मत

दरम्यान, मुख्यमंत्री या घटनात्मक पदाबद्दल अपशब्द वापरणे गैर असले तरी तसे कारण पोलिसांनी न दाखवता ग्रामपंचायत निवडणुकांचे कारण दाखवत कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे. यातून नव्या वादाला तोंड फूटण्याची शक्यता आहे. या घटनेने शहापूर मध्ये तणावपूर्ण शांतता असली तरी ठाकरे गट आणि शिंदे समर्थक यामध्ये ठिणगी पडली असून याचे पडसाद उमटू शकतात असं बोलले जात आहे.

राज्यात साडेआठ हजार शाळांमध्ये राबवली जाणार ‘पीएमश्री’ योजना, वाचा नेमकी काय आहे ही योजना?

Spread the love
Exit mobile version