Site icon e लोकहित | Marathi News

80 वर्षाची आजी करोडपती; “बाजारात जाता जाता लॉटरीचे तिकीट घेतले आणि…”

80-year-old grandmother is a millionaire; "Picked up a lottery ticket on the way to the market and…"

‘भगवान जब देता है तब छप्पर फाड के देता है’ असं म्हणतात ते खरंच आहे. कारण एका सर्वसामान्य घरातील 80 वर्षाच्या आजींनी नुकतीच चक्क 8 कोटींची लॉटरी ( Lottory) जिंकली आहे. बाजारात जाता या आजीने लॉटरी चे तिकीट घेतले आणि सहज स्कॅन करून पाहिले तर आजी लॉटरी जिंकली होती. यामुळे या 80 वर्षीय आजींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मोठी बातमी! नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदींचे निधन

मिळालेल्या माहितीनुसार या आजी अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmadnagar) आहेत. गॅस स्टेशनवर या आजीने जयभोटे लॉटरी येथून अगदी सहज स्क्रॅच ऑफ लॉटरीचे तिकीट घेतले होते. यानंतर आजींनी तिकिटावरील कोड स्क्रॅच केला आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, यावेळी त्यांनी चक्क 8 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली होती. शांताबाई रघुनाथ कानडे असे या आजींचे नाव आहे.

रानजनावरांची भीती, रात्रीची वीज, बळीराजाची परिस्थिती आहे तशीच!

लॉटरी जिंकल्यानंतर या आजींनी लॉटरी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांनी पहिल्यांदाच तिकिटाचा बार कोड स्क्रॅच केला होता. आजींना आपण 8 कोटी जिंकलोय यावर विश्वास बसत न्हवता. यामुळे त्यांनी मशीनवर वारंवार स्कॅन करून पाहिले. अखेरीस लॉटरी जिंकल्याची खात्री पटल्यावर त्या थांबल्या. या आनंदात आजींना रात्रभर झोप देखील लागली नाही. दरम्यान आजींनी ओळख न सांगण्याची विनंती लॉटरी अधिकाऱ्यांना केली होती.

शरद पवार कुटुंबियांची सीबीआय चौकशी होणार? लवासा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

Spread the love
Exit mobile version