सहलीसाठी गेले अन् जेवणातून ८२ विद्यार्थ्यांना विषबाधा; विद्यार्थी रूग्णालयामध्ये दाखल

82 students who went on a trip and got food poisoning; Student admitted to hospital

फेब्रुवारी (february) महिन्यामध्ये अनेक शाळांच्या सहली जात असतात. दरम्यान सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांबाबत सध्या एक धक्कादायक बातमी (A shocking news about the students who went on a trip) समोर आली आहे. अमरावतीहून शिर्डीला शालेय सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

बिग ब्रेकिंग! कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उतरणार मैदानात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती (Amravati) जिल्ह्यातील आदर्श हायस्कूलची (Adarsh ​​High School) सहल औरंगाबादवरून शेवगाव (Shevgaon) या ठिकाणी पोहचली होती. यांनतर सायंकाळच्या वेळी तेथे विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवण्यात आलं होतं. मात्र विद्यार्थ्यांनी जेवण करताच काही विद्यार्थ्यांना शिर्डी जवळ उलटी आणि मळमळीचा त्रास जाणवू लागला. यामध्ये जवळपास 227 विद्यार्थ्यांपैकी ८२ विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला.

ऊस वाहतूकदारांसाठी चक्काजाम आंदोलन होणार; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची घोषणा

याबाबत शिक्षकांना माहिती मिळताच विद्यार्थ्यांना उपचारासाठी शिर्डी साई संस्थानच्या (Shirdi Sai Institute) साईनाथ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या विद्यार्थ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे.

अबब! गायीने दिला चक्क चार वासरांना जन्म; वाचा सविस्तर बातमी

माहितीनुसार, यामध्ये काही विद्यार्थ्यांची तब्बेत बरी आहे त्यांना आज डिस्चार्ज मिळेल. मात्र ज्या विद्यार्थ्यांनवर उपचार सुरू आहेत त्यांना एक दोन दिवसात डिस्जार्च मिळेल. विद्यार्थ्यांना हा त्रास दुषित पाण्यामुळे झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय.

पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार अखेर बोललेच; म्हणाले…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *