
दौंड ( Daund) तालुक्यात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. पारगाव येथील भीमा नदीत एक नाही दोन नाही तर तब्बल सात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांकडून तपास सुरू असताना या घटनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ही घटना आत्महत्या नसून हत्या असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी आरोपींना अटकही करण्यात आली आहे.
पुण्याबरोबर आता साताऱ्यामध्ये कोयता गॅंगची दहशद
अटकेत असलेल्या आरोपींमध्ये पाच पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही तपासासाठी पथक तयार केले होते. या तपासा दरम्यान मिळालेल्या पुराव्यांवरून लक्षात आले की, या लोकांचा घातपात करून खून करण्यात आला आहे.
“वादळ येत आहे…”, रितेश देशमुखचे पठाण चित्रपटाबाबत केलेले ट्विट चर्चेत
या प्रकरणातील पाचही आरोपी नातेवाईक आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते एकाच गावातील रहिवासी आहेत. यातील आरोपी अशोक पवार यांचा भाऊ धनंजय पवार यांचा एका अपघातात मृत्यू झाला होता आणि त्याला कारणीभूत हत्या ( Murder) झालेले पवार कुटुंब होते. त्याचाच राग मनात धरून ही हत्या करण्यात आली आहे. याशिवाय हे सगळे आरोपी एकमेकांचे बहिणभाऊ आहेत.
एक पाय निकामी असून देखील सहावीत शिकणाऱ्या चिमुकल्याने सर केला रायगड किल्ला!