उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना आज व्यापार क्षेत्रात मोठा धक्का बसला आहे. भारतातील दिग्गज उद्योगपती म्हणून त्यांची ओळख आहे. मागील वर्षी त्यांनी शेअर बाजारात विक्रमी कमाई केली होती. मात्र आज अदानी समूहाला ( Adani Group) प्रचंड नुकसान सहन करावे लागले असून गुंतवणूकदारांना देखील फटका बसला आहे.
छोटा भाईजान म्हणजेच अब्दु रोजिक झळकणार आंतरराष्ट्रीय रिऍलिटी शोमध्ये!
हिंडेनबर्ग रिसर्चला आता अदानी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची नाही. याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर 10 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. हिंडेनबर्ग फायनान्शियल रिसर्च फर्मच्या अहवालात धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या मूल्यांकनात फेरफार केल्याचा दावा या अहवालात करण्यात आलाय.
सोलापूरातील भाविकांचा तिरुपतीहून येताना अपघात! चार जणांचा जागीच मृत्यू
मनी लॉड्रींग, टॅक्स डॉलर्स चोरी व भ्रष्टाचाराचे आरोप देखील यामध्ये करण्यात आले आहेत. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाच्या कंपन्यांनी कर्ज घेतले आणि शेअर्स तारण ठेवले यामुळे अदानी समूहाची आर्थिक स्थिती बिघडली आहे. हा अहवाल करताना अदानी समूहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत व हजारो कागपत्रांची तपासणी देखील करण्यात आली आहे.