सध्या कोल्हापूरमधील (Kolhapur) एका सातवीत शिकणाऱ्या मुलाची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. चर्चा होण्याचं कारण असं की, कोल्हापुरातील सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलाला चक्क एक कोटींची लॉटरी लागली आहे. कोल्हापुरच्या मुरगुड तालुक्यामधील हा मुलगा आहे.
प्रजासत्ताक दिनी हेड कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडत केली आत्महत्या!
लोक पैसे कमावण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर कष्ट करत असतात आणि या मुलाने खूप लहान वयामध्येच एक कोटींची लॉटरी (One crore lottery) जिंकली आहे. सातवीत शिकणारा मुलगा अवघ्या काही तासात कोट्यधीश झाला आहे. यामुळे सगळीकडे त्याच्या जोरदार चर्चा चालू आहेत.
सक्षम बाजीराव कुंभार (Saksham Bajirao Kumhar) या मुलाचे नाव असून त्याने नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यात ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन खेळात भाग घेतला. आणि यामध्ये काही पैसे लावले. त्यानंतर त्याला तब्बल एक कोटींचा जॅकपॉट लागला. मुलाला एक कोटींची लॉटरी लागल्यामुळे कुटुंबियांचा आनंद गगनात मावेना.
पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच ठाणे दौऱ्यावर; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण
सक्षमने लॉटरी जिंकलेली माहिती मिळताच त्याच्या गावकऱ्यांनी बाईक रॅली काढत त्याची जंगी मिरवणूक काढली. सक्षमच्या खात्यामध्ये ७० लाख रुपये जमा झाल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. यामध्ये कराची रक्कम वजा करुन पैसे खात्यात जमा झाल्याचे म्हटले जातंय.
मोठी बातमी! अदानी समूह संकटात; व्यापार क्षेत्रात बसला मोठा धक्का