“…म्हणून आफताबने दाबला होता श्रद्धाचा गळा”; अखेर हत्येचे कारण झाले उघड

"…so Aftab strangled Shraddha"; Finally, the reason for the murder was revealed

दिल्लीतील श्रद्धा वालकर ( Shraddha walkar) प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या प्रकरणी दिवसेंदिवस नवीन खुलासे समोर येत आहेत. श्रद्धा सोबत लिव्ह इन मध्ये राहत असलेल्या आफताबने तिची हत्या करून शरीराचे तुकडे केले होते. हे तुकडे त्याने शहरातील वेगवेगळ्या भागात टाकले होते. दरम्यान श्रद्धाची हत्या करण्यात आली त्या रात्री नेमकं काय घडलं? याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.

ब्रेकिंग! अचानक तब्बेत बिघडल्याने अभिनेते अन्नू कपूर रूग्णालयात दाखल

श्रद्धा आणि आफताबची ओळख एका डेटिंग अ‌ॅपवर (Dating App) झाली होती. बंबल असे त्या डेटिंग अ‌ॅपचे नाव आहे. दरम्यान ते दोघे एकत्र आल्यानंतर देखील श्रद्धाच्या फोनमध्ये ते अ‌ॅप होते. यावरच श्रद्धाची एका नवीन मुलासोबत ओळख झाली होती. 17 तारखेला श्रद्धा त्या मुलाला भेटण्यासाठी गुरुग्राम येथे गेली होती. दुसऱ्या दिवशी 18 तारखेपर्यंत आफताब तिची वाट बघत होता. यावेळी सकाळी 11 च्या सुमारास श्रद्धा घरी आली. तेव्हा श्रद्धा व आफताब यांच्यात मोठा वाद झाला.

दौंड हत्याकांडाचे गूढ वाढले; पुरलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी बाहेर काढले

यामध्ये आफताबने श्रद्धाला मारहाण देखील केली. मात्र थोड्या वेळाने वातावरण निवळल्यानंतर त्यांनी दोघांसाठी जेवण सुद्धा मागवले होते. दरम्यान संध्याकाळी पुन्हा एकदा श्रद्धा घरी आली नाही. याच कारणाने आफताब चिडला व त्याने रागाच्या भरात श्रद्धाचा गळा दाबला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बारामतीमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक पदाधिकारी व कार्यकत्यांनी केला शिंदे गटात प्रवेश

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *