सोशल मीडियावर रील बनवणे हे आजकाल लोकांना आवडू लागले आहे. दरम्यान झेंडावंदन साठी गाडीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रील बनवणे चांगलेच महागात पडले आहे. परभणी येथे एकाच गाडीवरून जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा भीषण अपघात ( Bike Accident) झाला आहे. यामध्ये एका विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.
शरद पवारांविषयी आदर राखून बोलावे, संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकर यांना इशारा
परभणी (Parbhani) च्या सोनपेठ मार्गावर ही घटना घडली आहे. काल ( दि.26) सकाळी झेंडावंदनाला जाताना मेला या चित्रपटातील डर है तुझे किस बात का? या गाण्यावर हे विद्यार्थी रील तयार करत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. महत्त्वाची बाब म्हणजे हे विद्यार्थी सध्या नववीच्या वर्गात शिकत आहेत. अपघात झाल्यानंतर या चारही विद्यार्थ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एक दोन नव्हे तब्बल आठ जणांनी केला स्कुटीवर एकत्र प्रवास; पाहा व्हायरल VIDEO
परभणीच्या पाथरी सोनपेठ मार्गावरून शाळेत जात असताना हा अपघात झाला आहे. यामध्ये शंतनू सोनवणे या विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला असून इतर विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या विद्यार्थ्यांवर आंबेजोगाई पोलीस ठाण्यात उपचार सुरू आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना त्यांचा निष्काळजीपणा फार महागात पडला आहे.
सुप्रिया सुळेंना पहिल्या नजरेतच खूप आवडला होता ‘हा’ अभिनेता; स्वतःच केला खुलासा