कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर नवीन राज्यपाल कोण? महत्वाची अपडेट आली समोर!

Who is the new governor after Koshyari's resignation? An important update has arrived!

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagat Sinh Koshyari) काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात होती. दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी लवकरच राजीनामा देणार असल्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. आपले भावी आयुष्य वाचन व लेखनात घालवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

के एल राहूलला लग्नामध्ये विराट कोहलीने गिफ्ट केली BMW कार! किंमत ऐकून व्हाल थक्क

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यांनतर नवीन राज्यपाल कोण असतील? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. यामधेच पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं नाव आघाडीवर आहे. पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याचबरोबर राज्यपालपदासाठी सुमित्रा महाजन यांचं देखील नाव चर्चेत आहे. मात्र हे दोन नाव चर्चेत असली तरीदेखील अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचं निधन

दरम्यान, मधल्या काळात भगतसिंग कोश्यारी सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकत होते. त्यामुळे भाजपा समोरील आव्हाने देखील वाढत होती. आता त्या आव्हानांच्याच पार्श्वभूमीवर कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

गाडीवर रील बनवताना शाळकरी विद्यार्थ्यांचा गंभीर अपघात; एक जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *