“तो माझा जावई नाही…”, सुनील शेट्टीचं केएल राहुलबद्दल धक्कादायक विधान

“He is not my son-in-law…”, Sunil Shetty's shocking statement about KL Rahul

अभिनेत्री आथिया शेट्टी (Aathiya Shetty Wedding) व क्रिकेटर के एल राहूल ( KL Rahul) यांनी ( दि.23) लग्नगाठ बांधली. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊस मध्ये दाक्षिणात्य पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी ठराविक लोकांचीच उपस्थिती होती. या दोघांच्या लग्नाची मीडियामध्ये बरीच चर्चा झाली.

बाॅयफ्रेंडबद्दल आर्चीने केला मोठा खुलासा; म्हणाली, ‘त्यामध्ये लपवण्यासारखं काहीच नाही’

लग्नाच्या रिसेप्शन बद्दल विचारण्यात आले असता अभिनेते सुनील शेट्टी ( Sunil Shetty) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. के एल राहुलच्या आयपीएल सामन्यांनंतर रिसेप्शन होणार आहे. यावेळी ते म्हणाले की, “केएल राहुल हा माझा जावई नसून मुलगाच आहे. मी जरी नात्याने त्याचा सासरा असलो तरी तो माझा मुलगाच आहे.”

शरद पवारांविषयी आदर राखून बोलावे, संजय राऊतांचा विधानावर प्रकाश आंबेडकर यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

दरम्यान, अथिया-राहुल मागील 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 साली एका मित्राच्या पार्टीत केएल राहुलने अथियाला पाहिलं होतं. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आणि आता ते दोघे नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. अवघ्या 100 लोकांच्या उपस्थितीमध्ये या दोघांचा विवाह सोहळा पार पडला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *